एक युवक अजूनही बेपत्ता.
चंद्रपूर:- घुग्गुस शहरातील १२-१५ वर्षांचा मुलांचा मित्रमंडळी चारपाच मुले शनिवारी सकाळी पोहायला गेली असताना. वर्धा नदी चिंचोली घाट पात्रात खोल पाण्यात अंदाज न आल्याने तीन मुले बुडाली असून ते वाहून गेले असून यामध्ये अनिल गोगला ( 15 ) व सुजल वनकर ( 16 ) हे दोघे बचावले असून पृथ्वीराज आसुटकर, प्रेम गेडाम, प्रचन वानखेडे हे मुले नदीत वाहत गेल्याचे वृत्त आहे.
हेही वाचा:- वर्धा नदीत पोहण्यासाठी गेलेले 3 अल्पवयीन मुलं बुडाले.
घुग्घुस पोलिसांनी बुडालेल्या तिन युवकांना शोधण्यासाठी शनिवार सायंकाळी दोन बोट व शोध पथक चंद्रपूर येथुन बोलाविले होती.
आज सकाळी घुग्घुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे, माजी जिप सदस्य चिन्नाजी नलभोगा, भाजपा वाहतूक आघाडीचे उपाध्यक्ष विनोद चौधरी, घुग्घुस भाजपा युवामोर्चा शहराध्यक्ष अमोल थेरे, भाजपाचे शरद गेडाम, कोमल ठाकरे, स्वप्नील इंगोले यांनी घटनास्थळी धाव घेतली.
घुग्घुसचे पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे, सहा.पो.नि. गोरक्षनाथ नागलोत, मंगेश निरंजने व रंजित भुरसे यांनी घटनास्थळी बचाव पथकासह शोध मोहीम राबवित असतांना प्रचल प्रशांत वानखेडे (१५) रा. वार्ड क्र.२ घुग्घुस व प्रुथ्विराज पुंडलीक आसुटकर (२१) रा. वार्ड क्र २ घुग्घुस याचा म्रूतदेह आढळला पोलिसांनी पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी पाठविनार आहे.