CCTV फुटेज व मोबाईल संभाषण रिकार्ड वरून पोलीस त्या वयक्तीचा कसून शोध सुरू.
बल्लारपुर:-दिवाळीच्या एक दिवस अगोदर एका युवकांनी तहसीलदार चा पिए सांगून मिठाई चा मोठा ऑर्डर घेऊन बेंगलोर बेकरी मध्ये गेला. दुकानातील कामगार चा मोबाईल मधून फोन करून बेकरी चा मालकाला मिठाई चा मोठाऑर्डर दिला विश्वासात घेत सांगितले की तहसीलदार साहेबां कडे दोन हजार चा नोटा चा बंडल आहे तुम्ही पाचशे(500)रु, चा नोटा घेऊन चला तुम्हाला तहसील ऑफिसमध्ये 2000 चा नोटा देतो. 45 हजार चा ऑर्डर देत 55हजार रु मालकाने दुकान कामगार यांना दिले व दोघेही तहसील कार्यालय गेले तिथे गेल्यावर कामगार मुलाला तहसील गेटवरच उभे ठेवून त्याचा कडून 55हजार रु घेऊन आत मध्ये गेला आणि परतच नाही आला,खूब वेळ झाल्या नंतरही परत नाही आल्याने त्या व्यक्तीला शोधण्यासाठी सर्वी कडे पाहल्या नंतर तो व्यक्ति सापडला नाही. तहसिल कार्यलयात जाऊन विचार पूस केली असता त्यांनी सांगितले की असे काहीही ऑर्डर दिली नाही आणि तो व्यक्ती इथे आला आणि आम्हाला म्हणाला की मी pwd ऑफिस मधून आलो आणि आम्हाला तहसील कार्यालयाची रंग रंगोटी करायची आहे असे म्हणून तो निघून गेला. बेंगलोर बेकरी चा मालकाला फसवणूक झाल्याचे कळल्यावर मालकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली व cctv फुटेज व मोबाईल संभाषण रेकॉर्ड दिले बल्लारपुर पोलीस त्या वयक्तीचा कसून शोध घेत आहेत.