सामाजिक युवा ब्रिगेड संगठना तसेच नवरगावातील जनतेच्या वतीने दि. 15/12/ धरणे आंदोलन.

Bhairav Diwase
रोड बनले अपघाताला आमंत्रण.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- मागील वर्षा पासून सिंदेवाही ते नवरगाव रोड हा अरुंद असून बाजूला मुरूम चा स्लोप भरला नसल्यामुळे रोज अपघात होत आहे. त्यामुळे वारंवार सार्वजनिक बांधकाम विभाग सिंदेवाही यांना संघटनेच्या वतीने निवेदन देऊन सुद्धा तसेच पालकमंत्री मा. विजय वडेट्टीवार यांनी आदेश देऊन सुद्धा अजूनही दखल Pwd ने घेतलेली नाही.


         त्यामुळे दिवसेंदिवस रोज अपघाताला आमंत्रण दिल्या सारखे होत आहे. या रोडची दखल कोणीही घेत नसल्यामुळे समस्त नवरगावातील जनता, सामाजिक युवा ब्रिगेड संगठना, व्यापारी युनियन, ऑटो रिक्षा चालक युनियन, सर्व नवरगाव मधील शाळा, कॉलेज मिळून 15/12/2020 रोज मंगळवारला ठीक सकाळी 10:30 वाजता सिंदेवाही फाटा या ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहेत. जो पर्यंत रोडच्या बाजूला भरन भरल्या जात नाही तो पर्यंत कोणीही रस्त्यावरून हटणार नाही असे धरणे आंदोलनात ठरविले आहे. या धरणे आंदोलनात बहुसंख्याने लोक हजर राहण्याचे ठरले आहे.