भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी यांच्‍या जन्‍मदिनानिमीत्‍त 25 डिसेंबरला बल्‍लारपूर शहरात विविध विकासकामांचे लोकार्पण.

Bhairav Diwase
माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांची विशेष उपस्थिती.
Bhairav Diwase. Dec 24, 2020


बल्लारपूर:- भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी यांच्‍या जन्‍मदिनाचे औचित्‍य साधुन दिनांक 25  डिसेंबर रोजी बल्‍लारपूर नगर परिषद क्षेत्रात माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने मंजूर भाजी मार्केट, ई-वाचनालये, चार बालोद्यानाचे लोकार्पण समारंभपूर्वक संपन्‍न होणार आहे.

बल्‍लारपूर शहरात अत्‍याधुनिक स्‍वरूपाचे भाजी मार्केट, ई-वाचनालये तसेच चार बालोद्यान आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने पूर्णत्‍वास आले आहेत. या विकासकामांचे लोकार्पण भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी यांच्‍या जयंतीदिनाचे औचित्‍य साधुन दुपारी 12 ते 3 वा. दरम्‍यान करण्‍यात येणार आहे. या कार्यक्रमाला आ. सुधीर मुनगंटीवार यांची विशेष उपस्थिती राहणार असून भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते चंदनसिंह चंदेल, बल्‍लारपूरचे नगराध्‍यक्ष हरीश शर्मा, माजी आमदार जैनुद्दीन जव्‍हेरी, भाजपा नेत्‍या सौ. रेणुका दुधे, काशी सिंह, शिवचंद द्विवेदी, आशिष देवतळे, मनिष पांडे, समीर केने, निलेश खरबडे, अजय दुबे, अॅड. रणंजय सिंह, राजू दारी, सौ. मिना चौधरी आदींची प्रामुख्‍याने उपस्थित राहणार आहे.

या लोकार्पण सोहळयानंतर बल्‍लारपूर येथील नाटयगृहात आयोजित सभेला आ. सुधीर मुनगंटीवार संबोधित करणार आहे. या लोकार्पण सोहळयाला व सभेला नागरिकांनी उपस्‍थीत राहण्‍याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्‍यात आले आहे.