आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे हस्ते शुभारंभ.
चंद्रपूर:- भारतरत्न पंतप्रधान स्व अटलबिहारी बाजपेयी यांच्या ९५, व्या जयंतीचे औचित्य साधून चंद्रपुर भारतीय जनता पार्टीच्या वतीने डिजिटल सदस्य नोंदणी पर्वाला शुक्रवार (२५ डिसेंबर) ला सुरवात करण्यात आली. या अभियानाचा शुभारंभ आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते बाबूपेठस्थित श्रद्धेय माजी पंतप्रधान अटलबिहारी स्टेडियम येथील अटलजींच्या पुतळ्याला आदरांजली स्वरूप माल्यार्पण करून करण्यात आला.
या प्रसंगी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे, महापौर राखी कांचर्लावार, महामंत्री राजेंद्र गांधी, सुभाष कासंगोटूवार, ब्रिजभूषण पाझारे, रवींद्र गुरनुले, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अंजली घोटेकर, मंडळ अध्यक्ष संदीप आगलावे, नगरसेवक संजय कांचर्लावार, रवी आसवानी, प्रदीप किरमे, कल्पना बगुलकर, प्रज्ञा बोरगमवार, मंजुश्री कासंगोटूवार, शिला चव्हाण, प्रशांत विघ्नेश्वर, रामकुमार अकापेल्लीवार, गणेश गेडाम आदींची उपस्थिती होती.
यावेळी आ मुनगंटीवार म्हणाले, महाराष्ट्रात पहिल्यांदाच डिजिटल सदस्य नोंदणीपर्वाला सुरुवात होत आहे. या डिजिटल माध्यमातून संघटना व जनतेचे प्रश्न सहजपणे मांडता येईल व सोडविता येईल. संघटनेला योग्य व्यासपीठ मिळेल. जनतेची सेवा करण्यासाठी हा ऍप काम करेल. श्रद्धेय अटलजी म्हणायचे, कदम मिलाकर चलना होगा .... आपल्यालाही एकमेकाला सहकार्याच्या भावनेतून जनसेवा करायची आहे. असा संदेश त्यांनी यावेळी दिला.
अटलजींनी संपूर्ण आयुष्य देशसेवेत अर्पण केले. त्यांच्या जनसेवेचा मूलमंत्र सर्वांनी अंगिकारावा असे आवाहन त्यांनी केले. २५ डिसेंबर ते २५ जानेवारी अटल डिजिटल भाजप सदस्य नोंदणी अभियान राबविले जाणार आहे. अशी माहिती कासंगोटूवार यांनी दिली. यावेळी जेष्ठ भाजप नेते रामेशजी बागला, दिवाकर पुद्दटवार, चंद्रशेखर गन्नूरवार, प्रिया पेंदाम व भगिनी यांचा आ मुनगंटीवार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्तविक सुभाष कासंगोटूवार यांनी केले, तर संदीप आगलावे यांनी आभार मानले.