Click Here...👇👇👇

ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात भाजपाची आढावा बैठक संपन्न.

Bhairav Diwase
1 minute read

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा तालुकातील २८ ग्रामपंचायत ची होऊ घातलेल्या निवडणूक संदर्भात माजी आमदार अँड. संजय धोटे याचे अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.   
      सदर बैठकीला या क्षेत्रातील मान्यवर माजी आमदार सुदर्शन जी निमकर, जिल्हा परिषदेचे सभापती श्री. सुनील उरकुडे, भाजपाचे जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा सतिश धोटे, भाजपा जिल्हा सचिव वाघुजी गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष हरिदास झाडे, तालुका मंहामंत्री दिलीप वांढरे, श्री. प्रशांत घरोटे तसेच प्रमुख मान्यवर भाऊराव भाऊ चंदणखेडे, सतिश कोमड्पल्लीवार, विजय धानोरकर, दिलिप गिरसावळे, सचिन शेंडे, व ईतर पदाधिकारी उपस्थित होते.
          सदर बैठकीत मान्यवर चे उपस्थित ग्रामपंचायत हद्दीतील प्रमुख नेतेमंडळी तथा पदाधिकारी व्दारा ग्रामपंचायत ची माहिती घेण्यात आली. राजुरा तालुक्यातील २८ ग्रामपंचायत ची निवडणूक विषयी आढावा बैठक घेण्यात आली.