डॉ. बाबासाहेब आंबेडकर आजच्या युवकांसाठी प्रेरणा स्थान:- श्री. सुरज गुरनुले युवा नेते, ज्ञानज्योती माळी समाज सावली

Bhairav Diwase
ज्ञान ज्योती माळी समाज युवा सावली तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) धनराज कोहळे रैयतवारी (जांब), सावली
सावली:- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आज ज्ञानज्योती माळी समाज युवा सावली तर्फे रमाबाई आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रांगणात आदरांजली वाहण्यात आली. तसेच महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्प माल्यार्पण करण्यात आले.
      


    यावेळी ज्ञान ज्योती माळी समाजाचे युवा नेते सुरज गुरनुले यांनी आपले मत व्यक्त केले. मत व्यक्त करताना त्यांनी आजच्या दिवशी या भारत देशातील सूर्य आज जगाला सोडून खूप दूर निघून गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील जंगलात असणाऱ्या शिकाऱ्या पासून ते भिकाऱ्या पर्यंत मतदानाचा हक्क प्राप्त करून दिला. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि एकात्मता चे बीज प्रत्येकांच्या मनात रुजवली.
                                                                       स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ, समाजसुधारक, पत्रकार, वकील, दलित बौद्ध चळवळीचे प्रेरणास्थान आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन म्हणून संपुर्ण भारत भर साजरा करण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रचंड बुद्धिमत्ता, समाजासाठी असीम त्याग करणारे, दलित समाजाला हक्क मिळवून देणारे, महाडचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन, मंदिर सत्याग्रह, शेतकऱ्यांचा कैवारी, गोलमेज परिषद, पुणे करार, स्वतंत्र मजूर पक्ष, बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना, दलित शिक्षण संस्थेची स्थापना, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना, महिलांसाठी कार्य, स्वातंत्र्य लढ्यात सहभाग अशा कितीतरी गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात केल्या. समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा प्रामुख्याने विचार केला. शिक्षणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा गुरुमंत्र दिला. असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आज आदरांजली वाहण्यात येत आहे.
                                                                         यावेळी उपस्थित ज्ञान जोती माळी समाज युवा सदस्य रवी वाढई, सचिन प्रधाने, मिलिंद शेंडे, सुमित लेनगुरे, महेश मांदाळे, महेश गुरनुले, विक्रांत कावळे, सुरज आवळे, सचिन ढोले, शिवराज गुरनुले, नागेश वाढई, नितेश शेंडे, अमर शेंडे, भास्कर शेंडे, बंटी शेंडे, हुसेन प्रधाने, अभि प्रधाने, व संपूर्ण युवा उपस्थित होते...