गॅस पाईप लीक झाल्याने स्फोट.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Dec 25, 2020
(संबंधित छायाचित्र)
ब्रम्हपुरी:- स्थानिक शेषनगर येथील रहिवासी विजय जयस्वाल यांच्या राहत्या घरी गुरुवारी सकाळी गॅस पाईप लीक झाल्याने स्फोट झाला. यात घरमालक विजय जयस्वाल किरकोळ जखमी झाले. ही घटना गुरुवारी घडली.

प्राप्त माहितीनुसार गुरुवारी सकाळी घरगुती वापरासाठी गॅस चालू केला असताना पाईप अचानक लीक झाल्याने गॅसचा घरात स्फोट झाला. यात जयस्वाल कुटुंबाचे घरगुती वापरासाठी असलेले सामान, अन्नधान्य, भांडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर असा एकूण जवळपास अडीच लाख रुपयांचा ऐवज जळून खाक झाला. सदर घटना घडली त्यावेळी कुटुंबियांनी लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा मारा करून गॅस हंडा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

यात विजय जयस्वाल जखमी झाले. लागलेल्या आगीने संपूर्ण घर काळेकुट्ट झाले असून तातडीने गॅस एजन्सी मालक पिंटू मोरे यांनी धाव घेत पाहणी करून घटनेचा पंचनामा केला आहे. तसेच प्रशासनाच्या वतीनेसुद्धा पंचनामा करण्यात आला आहे.