Top News

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना ऑफलाईन अर्ज सादर करण्‍याची परवानगी द्यावी:- आ. सुधीर मुनगंटीवार यांची मागणी.


Bhairav Diwase.   Dec 29, 2020
चंद्रपूर:- ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना ऑफलाईन अर्ज सादर करण्‍याची परवानगी देण्‍याची मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍य निवडणुक यांनी अधिकारी श्री. मदान यांच्‍याकडे केली आहे.

     आ. मुनगंटीवार यांनी श्री. मदान यांना पाठविलेल्‍या पत्रात म्‍हटले आहे की, दिनांक ३० डिसेंबर २०२० ही ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आवेदन करण्‍याची शेवटीची तारीख आहे. चंद्रपूर जिल्‍हयातील काही तालुक्‍यांमध्‍ये बीएसएनएल च्‍या नेटवर्क मधील अनियमिततेमुळे उमेदवारांना त्रास सहन करावा लागत आहे. अतिशय मंदगतीने इंटरनेट चालु असल्‍याने उमेदवार त्रस्‍त झाले आहेत. लोकशाहीमध्‍ये ज्‍या निवडणुकीला गावपातळीवरील विधानसभा म्‍हटले जाते अशा ग्रामपंचायत निवडणुकीमध्‍ये उमेदवारांना अर्ज भरण्‍याच्‍या प्रक्रियेतच गैरसोयीचा सामाना करावा लागत आहे. राज्‍यातील इतरही जिल्‍हयांमध्‍ये ही समस्‍या उमेदवारांना सहन करावी लागतच आहे.

     उमेदवाराला प्रचारा ऐवजी अर्ज भरण्‍याच्‍या प्रक्रियेतच वेळ द्यावा लागत आहे. इंटरनेटच्‍या समस्‍येमुळे फॉर्म अपलोड होत नसल्‍याने प्रक्रिया क्लिष्‍ट झाली आहे. अर्ज भरण्‍याची प्रक्रिया सहज, सुलभ, सरळ असणे अपेक्षित आहे. मात्र इंटरनेटच्‍या समस्‍येमुळे ही प्रक्रिया सहज, सुलभ, सरळ उरलेली नाही. त्‍यामुळे उमेदवार चिंतीत झाले आहे. अर्ज भरण्‍याची प्रक्रिया ऑनलाईन न करता ऑफलाईन अर्ज सादर करण्‍याची अनुमती उमेदवारांना देण्‍याची आवश्‍यकता असल्‍याचे आ. मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने