(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- राजुरा शहरातील प्रमुख मार्गांवर मोठं मोठे खड्डे पडले आहे. या खड्यांमुळे अनेक अपघात देखील आजवर झाले असून अनेक प्रवाश्यांना दुखपतींना सामोरे जावे लागले आहे. अनेक गाड्यांची दुर्दशा ही होताना दिसत आहे. या सर्व समस्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास होत असून लवकरात लवकर या रस्त्यांची दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा या वेळी युवकांनी दिला.
पुढील 10 दिवसात या रस्त्याची दुरुस्ती करून नागरिकांना होणारा त्रास दूर करावा अन्यथा रस्त्यांवरील खड्यांना श्रद्धांजली अर्पण करून आंदोलन करण्यात येईल असे नोवेदनात नमूद करून तहसीलदार राजुरा यांना विनंती निवेदन सुपूर्द करण्यात आले.
यावेळी केतन जूनघरे, सुजित कावळे, उत्पल गोरे, निलेश बोन्सुले , चेतन सातपुते, यश मोरे, भूषण जुनघरे, मनोज वासाडे, उपस्थित होते.