(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- दिनांक 09/12/2020 मौजा -पांढरवाणी ता. सिंदेवाही येथे राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत जमीन आरोग्य पत्रिका योजना सन-2020-21अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. नशिकेत आत्राम पोलीस पाटिल , श्री ए. आर.महाले मंडळ कृषी अधिकारी , नवरगांव , श्री. गुरुदास अर्जुन मसराम, प्रगतशील शेतकरी( सेंद्रिय शेती),पांढरवाणी, सौ. वर्षा नामदेव आळे, सचिव महिला बचत गट,श्री.व्ही.जी.निमगडे कृ.प. नवरगांव, श्री. डी. व्ही. भानारकर कृषी सहायक, रत्नापूर आणि श्री आर. एस . धुडे कृषी सेवक,शिवणी उपस्थित होते.
तसेच कार्यक्रमामध्ये श्री ए. आर.महाले यानी जमीनचे आरोग्य , जमिनीचे गुणधर्म आणि जमीन आरोग्य पत्रिका वाचन व महत्व, माती नमुने काढने या विषयावर मार्गदर्शन केले,श्री आर.एस.धुडे यानी मुख्य अन्नद्रव्ये,दुय्यम अन्नद्रव्ये, सूक्ष्म अन्नद्रव, सेंद्रिय पदार्थ, हिरवळीचे खत,जीवाणू खते यांचा वापर व कार्यपद्धती या विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले त्यानंतर श्री गुरुदास मसराम यानी रासायनिक किटकनाशक/बुरशीनाशक चा वापर न करता सेंद्रिय शेती पद्धती, निंबोळी अर्क,दशपर्णी अर्क, जिवामृत व लसुण,मिरची,अद्र्क अर्क (ल.मि.अ. अर्क ) यांचा वापर करुन लागवड खर्चा मधे कशी बचत करता येईल या विषयावर मार्गदर्शन केले, सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री आर. एस धुडे कृषी सेवक,शिवणी व आभार प्रदर्शन श्री डी.व्ही.भानारकर कृषी सहायक,रत्नापूर यानी केले,सदर कार्यक्रमाला पांढरवाणी येथील शेतकरी, महिला शेतकरी उपस्थीत होते.
राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान कार्यशाळा यशस्वी.
बुधवार, डिसेंबर ०९, २०२०