पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित अध्यक्षांचा जिल्हा युवा सेनेतर्फे सत्कार.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईच्या भद्रावती तालुका शाखेचे नवनिर्वाचित अध्यक्ष शंकर बोरघरे यांचा नुकताच चंद्रपूर जिल्हा युवा सेनेतर्फे सत्कार करण्यात आला. 
      युवा सेनेचे चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत दादा कदम, युवासेना कार्यकारणी सदस्य रुपेश दादा कदम, चंद्रपूर जिल्हा विस्तारक नित्यानंद त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात युवा सेना जिल्हा प्रमुख हर्षल शिंदे यांच्या हस्ते शंकर बोरघरे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी युवा सेनेचे जिल्हा समन्वयक पप्पू सारवन, तालुका संघटक महेश जीवतोडे, योगेश काकडे,कल्याण मंडल, आशिष शर्मा,शैलेश पारेकर,सबाने, सूरज डाखरे,अमोल शिंदे,अमोल कोल्हे तसेच पत्रकार संघाचे पदाधिकारी अब्बास अजानी, जावेद शेख, रुपचंद धारणे उपस्थित होते.