विदर्भात धाकधूक वाढली.
नागपूर:- नागपुरातील 28 वर्षीय तरुण पुण्यात एका कंपनीत काम करायचा, पुढे त्याला कम्पणीच्या महत्वाच्या कामासाठी इंग्लंडला गेला, 29 नोव्हेंबरला नागपूरला परत आल्यावर तो गोंदीयाला गेला. त्याच्या संपर्कातील 10 जण हे पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे सोबतच त्या तरुणाचे कुटुंब सुद्धा कोरेन्टाईन करण्यात आले आहे.
ब्रिटन मध्ये नव्या कोरोना स्ट्रेन आढळल्याने जगभरात दहशत निर्माण झाली आहे. आधीच्या विषाणूपेक्षा हा 70 टक्के वेगाने पसरत असून आधीपेक्षा तो अधिक घातक असल्याचे बोलले जात आहे.
त्या युवकाला झालेला कोरोना तो आहे की आधीचा यावर सध्या संशोधन सुरू आहे. त्या युवकाने नागपूर नंतर गोंदियात प्रवास केल्याने त्या परिसरात भीती निर्माण झाली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना काळातील नियम पाळणे आवश्यक आहे .