Top News

स्वर्गीय श्रीराम आस्वले यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ नवजात शिशुनां बेबीकीटचे वाटप.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ राजुरा यांचा पुढाकार.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- महाराष्ट्र मराठी पत्रकार संघ, मुंबई शाखा राजुरा तर्फे संघाचे सहसचिव श्री ओंकार आस्वले यांचे वडील स्वर्गीय श्रीराम आस्वले गुरुजी यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ आज दि. 29 डिसेंबर 2020 रोज मंगळवारला सामान्य ग्रामीण रुग्णालय राजुरा येथील नवजात शिशुनां बेबीकीट वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
         
      त्याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ राजुराचे अध्यक्ष मा. प्रा. अनंत डोंगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. लहुजी कुळमेथे, सचिव राहुल थोरात, कार्याध्यक्ष रत्नाकर पायपरे, उपाध्यक्ष उज्वल भटारकर, प्रविण मेकर्तीवार, सहसचिव ओंकार आस्वले, ता. संघटक संतोष देरकर, कोषाध्यक्ष वैभव धोटे, प्रसिद्धी प्रमुख संतोष मेश्राम, जिल्हा प्रतिनिधी आदित्य भाके, प्रेस फोटोग्राफर रुपेश वाटेकर, कैलास कार्लेकर, संजय रामटेके, अंकुश भोंगळे यांची उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने