ग्रामीण रुग्णालय गडचांदुर ला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्या प्रहार ची मागणी.कोरप

Bhairav Diwase
ग्रामीण रुग्णालय येथे सोनोग्राफी सेंटर सुरू करा.

महिला रुग्णा करीता स्थायी एम बी बी एस स्त्री प्रसूती रोगतज्ञ स्त्री डॉक्टर ची नियुक्ती करा.
Bhairav Diwase. Dec 30, 2020
  
कोरपना:- गडचांदुर हे शहर औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते सोबतच जिवती व कोरपना या दोन तालुक्याचे मध्यवरती ठिकाण आहे या परिसरात सहा मोठे कारखाने आहेत ज्यामुळे रोजंदारी मजूर, शेतमजूर आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे प्राथमिक उपचारा नंतर रुग्णाला ग्रामीण रुग्णालय गडचांदुर येथे दाखल केले जाते रुग्ण जास्त गंभीर असला की त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर ला हलविण्यात येते तो पर्यंत अनेक रुग्णाचा जीव सुद्धा गेला व जातो 

   माणिकगड, अल्ट्रा टेक, अंबुजा, मुरली अग्रो,(दालमिया) सिमेंट कंपनी, पैनगंगा कोल खदान या सर्व कारखान्याचे वायू प्रदूषण, व ध्वनी प्रदूषणाने नागरिकांना अनेक आजाराने ग्रासले आहे त्याकरिता सर्व सोयीयुक्त ग्रामीण रुग्णालय गडचांदुर ला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा ही मागणी घेऊन प्रहार जनशक्ती पक्षा तर्फे निवेदन वैद्यकीय अधीक्षक डॉ गेडाम साहेब यांना देण्यात आले सोबत आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेब, राज्य मंत्री बच्चू कडू साहेब, जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांना सुद्धा निवेदन देण्यात आले गडचांदुर शहरात उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन सामान्य नागरिकांना योग्य उपचाराची संधी द्यावी अशी मागणी करण्यात आली.

विविध मागण्या मान्य करण्यात याव्या....

१) ग्रामीण रुग्णालय गडचांदुर येथे सोनोग्राफी सेंटर सुरू करण्यात यावे 
२) रुग्णालय समोर रुग्णाच्या नातेवाईकांना विश्रांती व भोजन करण्यास पक्की इमारत वा टिनाचे सेड उभारून द्यावे 
३) रुग्णालयाच्या कार्यालयाकडे व कर्मचाऱ्यांच्या निवसा कडे जाणाऱ्या रस्त्याचे त्वरित संपूर्ण डांबरिकरन करणे 
४) महिला रुग्ना करिता स्थायी एम बी बी एस स्त्री प्रसूती रोगतज्ञ डॉक्टर ची नियुक्ती करणे 
५) बंद असलेले आरो वॉटर सुरू करण्यात यावे 
६) रुग्णालयाच्या परिसरातील स्वच्छता व मागे बनवण्यात आलेले गार्डन ची स्वच्छता करून सुशोभीकरण करणे 

तरी सर्व मागण्या त्वरित पूर्ण करण्यात याव्या काही मागण्या माणिकगड सिमेंट कंपनी कडून सी एस आर फंडातून करून घेण्यात याव्या व शासन स्तरावरच्या मागण्याचे शासन स्तरावरून पूर्ण करण्यात याव्या अशी मागणी प्रहार ने केली 
या आधी सुध्दा प्रहार तर्फे उपजिल्हा रुग्णालयचा दर्जा मिळावा या साठी निवेदने दिलेली आहे. निवेदन देताना माजी तालुका अध्यक्ष सतीश बिडकर, पंकज मानुसमारे, सागर गुद्देलिवार, शैलेश विरुटकर, अरविंद वाघमारे उपस्थित होते