Top News

ऑफलाईन पद्धतीने देखील अर्ज स्वीकारल्या जाणार.

अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढली.

नविन बँक खाते उघडण्याची अट शिथिल, जुनी बँक खाते ग्राह्य पकडल्या जाणार.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतच्या निवडणुका होणार आहेत.त्या अनुषणगाने निवडणूक आयोगाने यापूर्वीच कार्यक्रम जाहीर केला आहे.अशातच सगळ्याची धाकधूक वाढली असताना अचानक निवडणूक आयोगाने ऑनलाईन वगळता ऑफलाईन पद्धतीने निवळनुकीचा उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा निर्णय घेतला.यातच सदर अर्ज सादर करण्याची मुदत देखील आयोगाने वाढली आहे.

महाराष्ट्र शासनाने कोरोना परिस्थिती उधभवल्यानंतर राज्यातील काही निवडणुका जाहीर केल्या.त्याचा कार्यक्रम देखील जाहीर झाला.उद्या दि 30 उमेदवारी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख असताना ऑनलाईन ऑफलाईन अर्ज भरण्याचा वाद विकोपाला गेला.अनेक बाबतीत बराच मानसिक ताण तणावाचा देखील विषय उदभवला.

    अशावेळी महाराष्ट्र शासनाच्या निवडणूक विभागाने २९ डिसेंम्बर रोजी अचानक शासन निर्णय निर्गमित करून अनेकांना सुखद धक्का दिला. बऱ्याच बाबतीत नेटची समशा उदभवली आणि याची तक्रार देखील राज्य निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाली.याच समशेमुळे राज्यात सर्वत्र अनेक उमेद्वारांचा हिरमोळ होणार ही बाब लक्षात घेता निवडणूक आयोगाने अंतिम क्षणी जनभावना लक्षात घेऊन आपल्या निर्णयात बदल केला.या संदर्भात गोंडपिपरी येथील तहसीलदार के.डी.मेश्राम यांच्याशी समर्क साधला असता त्यांनी ऑनलाईन अर्ज स्वीकारणे उद्याच्या तारखेसाठी दि ३० अनिवार्य नसल्याचे सांगितले. याशिवाय त्यांनी नेहमीच्या कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे ३ वाजेपर्यंत राहिलेली वेळ वाढवून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत राहील असेही तहसीलदारांनी आवर्जून सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने