चंद्रपूर:- आज सकाळी घुग्गुस ग्रामपंचायत कार्यालयात घुग्गुस नप मागणी साठी ठिय्या आंदोलन करण्यात आले.
सकाळी घुग्गुस ग्रामपंचायत कार्यालयात नगर परिषद मागणी साठी नेते गोळा झाले तिथे घुग्गुस नगर परिषद मागणी साठी ठिय्या आंदोलन केले.
या आंदोलनात चंद्रपूर काँग्रेस किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पाचरे, भाजपा नेते माजी सरपंच राजकुमार गोडसेलवार, काँग्रेस नेते जावेद सिद्दीकी, भाजपा नेते माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश बोबडे, भाजपा नेते श्याम आगदारी, काँगेस नेते गणेश उईके, रिपाई नेते बंडू रामटेके,यंग चंदा ब्रिगेडचे स्वप्नील वाढई भाजपा नेते अनिल मंत्रिवार उपस्थित होते