Top News

स्त्रीशक्तीचा अनादर करणार्‍या राष्ट्रवादीच्या त्या बलात्कारी नराधमाला फाशीची शिक्षा द्या!:- जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे

संभाजीनगर येथील युवतीवर झालेल्या बलात्काराच्या विरोधात बल्लारपुरात भव्य निषेध आंदोलन.

भाजयुमो व महिला आघाडीचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन.
Bhairav Diwase. Dec 30, 2020
बल्लारपूर:- राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख याने संभाजीनगर (औरंगाबाद) येथे नौकरी लावून देण्याचे कपटी आश्वासन देऊन येथील युवतीवर बलात्कार केला. या अतिशय निंदनीय घटनेच्या निषेधार्थ आज माजी अर्थमंत्री आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी गृहराज्यमंत्री मा.हंसराजजी अहिर, ज्येष्ठ नेते चंदन सिंहजी चंदेल, भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे व बल्लारपूर चे नगराध्यक्ष हरीशजी शर्मा यांच्या मार्गदर्शनात  व भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता युवा मोर्चा व महीला आघाडी यांच्यावतीने बल्लारपुर शहरात या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र सरकारच्या विरोधात भव्य आंदोलन करण्यात आले. 
आंदोलनानंतर बलात्कारी मेहबूब शेख याला तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी. अशी मागणी मा. मुख्यमंत्र्यांना तहसीलदारांमार्फत पाठविलेल्या निवेदनात भारतीय जनता युवा मोर्चा व महीला आघाडी यांनी केली आहे.
राज्यात बलात्कार्‍यांना शक्ती देण्याचं काम सरकार करतयं ज्यामुळे या विकृतांचे मनोबल वाढल्याचे दिवसेंदिवस पुढे येणार्‍या घटनांतून समोर येत आहे. तक्रार आल्यावर लगेच मुसक्या आवळल्या गेल्या पाहिजेत. राज्याचे गृहमंत्री ना.अनिल देशमुख हे स्वत: राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आहेत. आणि त्यांच्याच पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने असे स्त्रीशक्तीचा अवमान करणे आणि घटनेला जवळपास पंधरा दिवस होऊनही तपास व चौकशीच्या नावाखाली आरोपी मोकाट फिरणे हे त्यांना पटते का? या बलात्कार्‍याच्या विरोधात तात्काळ कारवाई करण्याबाबत त्यांची ठोस भूमिका दिसत नाही. असेच म्हणावे लागेल. त्यामुळे अशा अकार्यक्षम आणि बेजबाबदार गृहमंत्र्यांने सुद्धा आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा. असे मत यावेळी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी व्यक्त केले. 
या आंदोलनात प्रमुख उपस्थिती शिवचंदजी द्विवेदी, महिला आघाडी अध्यक्षा सौ. वैशालीताई जोशी, नगरसेवक येल्लय्या दासरफ, जयश्री मोहुर्ले, सुवर्णा भटारकर, पूजा रहीकवार, स्वामी रायबरम, व कांता ढोके, आरती आक्केवार, अर्चना हीरे,  शैला तावाडे, मोहन कलेगुरवार, किशोर मोहुर्ले, सतीश कनकम, नंदु नाडमवार, बुच्चय्या कंदीवार, गुलशन शर्मा, संजय बाजपेयी, श्रीकांत आंबेकर, राहुल बिसेन, प्रचलित धनरे, रामेश्वर पासवान, प्रतीक बारसागडे, हरी लंका, बबलु गुप्ता, संजय पारधी, पवन द्विवेदी, राकेश कांबळे, विक्की दुपारे, रिंकू गुप्ता, आदित्य शिंगाळे, करीम शेख, अभिषेक सातोकर यांसह भाजपा महिला आघाडी तथा युवामोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने