Click Here...👇👇👇

बल्लारपूरात पुस्तक प्रदर्शनाचे मा. विजय सरनाईक मुख्याधिकारी न.प. बल्लारपूर यांच्या हस्ते उद्घाटन.

Bhairav Diwase
1 minute read
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा बल्लारपूर चा उपक्रम.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- पुस्तक ही मानवाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतात पुस्तकामुळे मानवाला एक नवी दिशा प्राप्त होते महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाकरिता महत्वपूर्ण कार्य केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तर प्रसंगी वर्गाच्या बाहेर बसून अनेक हाल अपेष्टा सहन करून शिक्षण प्राप्त केले अशा त्या महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने अजब प्रकाशन कोल्हापूर व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा बल्लारपूर च्या वतीने बल्लारपूर शहरातील सिध्दार्थ नगर येथील सिध्दार्थ विहार(वाचनालय) या ठिकाणी 5 डिसेंम्बर 2020 ते 11 डिसेंम्बर 2020 पर्यंत भव्य पुस्तक प्रदर्शनी व विक्री चे आयोजन करण्यात आले आहे सदर ठिकाणी 100 ते 600 रु पर्यंतची कोणतीही पुस्तके केवळ 70/- रु विक्रीसाठी उपलब्ध आहे सदर प्रदर्शनी ही सकाळी 9:00 ते रात्री 9:00 वा पर्यंत असणार आहे या पुस्तक प्रदर्शनाचे उदघाटन बल्लारपूर शहराचे न.प.मुख्याधिकारी मा.विजयकुमार सरनाईक यांच्या हस्ते झाले यावेळी भगवान बुध्द व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले.
           यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते संजय डुंबेरे, संजयजी लोहकरे, जितेंद्र गेडाम ई ची उपस्थिती होती सदर उपक्रम व संकल्पना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष मा.प्रा महेश पानसे, जिल्हाध्यक्ष सुनिल बोकडे, जिल्हा कार्याध्यक्ष जितेंद्रजी चोरडिया यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आला यावेळी तालुकाध्यक्ष मुन्ना खेडकर, मनोहर दोतपेल्ली, विशाल डुंबेरे, दिपक भगत, राजू राठोड, देवानंद देशभ्रतार, वसंत मुन, धनंजय पांढरे, श्रीनिवास सिंगाराव,सुभाष बुजोने, शितल बेताल, गणेश टोंगे, विजय माटे ई ची उपस्थिती होती.