राजुरा:- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव , भारतरत्न, बोधिसत्व, डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ आंबेडकर चौक राजुरा येथे राजूऱ्यातील प्रतिष्ठित व्यापारी, झंवर ट्रेंड्स राजुराचे संचालक मा गजेंद्र झंवर यांच्या शुभ हस्ते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पित करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सर्व उपस्थित नागरिकांनी बुद्ध वंदना ग्रहण केली. या कार्यक्रमाला श्री संदेश करमनकर, वृक्षप्रेमी भास्कर सर, योगेश करमनकर, गुलाब करमनकर, छोटेबाबा करमनकर, सचिन करमनकर, गोरखनाथ वाघमारे, बबन वाघमारे, संजय मालवणकर, सतिश मालवणकर, प्रविण करमनकर, सुभाष चांदेकर, प्रशांत वनकर, महादेव चहारे, जोगेंद्र चहारे, कु, मानवी , जान्हवी, अनुजा, प्रगती, समिक्षा, चिन्मयी, कुमार प्रतिक निशांत, संस्कार, प्रबुध्द, सम्यक, श्री अरविंद मालखेडे, श्रीपत वनकर, श्रीमती निळाबाई करमनकर, सौ. प्रीती करमनकर यांची उपस्थिती होती.