अमराई येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Dec 09, 2020
चंद्रपूर:- घुग्घुस येथील अमराई वार्डात राहणा-या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग तेथीलच आरोपी सचिन संजय केदार (26) वर्षीय युवकाने सोमवारला केला.

        घडलेला प्रकार अल्पवयीन मुलीने आपल्या कुटुंबीयांना सांगताच सोमवारला पिडीत मुलीसह कुटुंबीयांनी घुग्घुस पोलीस स्टेशन गाठुन आरोपी सचिन संजय केदार विरुद्ध तक्रार दिली.
  तक्रारीवरुन घुग्घुस पोलीसांनी कलम 354, पास्को कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करुन सोमवारलाच रात्री दरम्यान अटक केली. 

हेही वाचा:- महाकुर्ला येथे विवाहीत महीलेचे लैंगिक शोषण.


आरोपी सचिन संजय केदार यास न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

हेही वाचा:- चंद्रपुरातील नामांकित CA रमेश मामीङवार यांचे आज निधन. 

पुढील तपास पो. नि. राहुल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात सहा.पो.नि.मेघा गोखरे करीत आहे.

बातमी संकलन:- पंकज रामटेके