नागरिकांना ओळख पटेल्यास दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा.
पोंभुर्णा:- पोलीस ठाणे पोंभुर्णा जिल्हा चंद्रपूर येथे मौजा चिंतलधाया येथील गायत्री राईस मील जवळ एक अनोळखी महीला वय अंदाजे ६५ वर्ष ही दि. 19/02/2020 रोजी रोडचे कडेला पडुन असल्या बाबत पो. स्टे पोभुर्णा येथे माहीती मिळाल्याने पो.स्टे.चे कर्मचारी व महीला कर्मचारी यांनी सदर महीलेला सरकरी वाहणा मध्ये उचलुन प्रा.आ.केंद्र पोभुर्णा येथे आणून उपचारास भर्ती केले व एम.ओ. सा. यांनी प्राथमीक उपचार करून सदर महिलास पुढील उपचारास सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे रेफर केल्याने पो.स्टे. पोंभुर्णा चे महीला पोलीस कर्मचारी यांचे हस्ते तिला सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे भरती केले व तिच्यावर उपचार सुरू असतांना ति दि. 23/02/2020 चे 23/20 वा. मरण पावली ति सामान्य रुग्णालय चंद्रपुर येथे भरती असतांना ति मनोरुग्ण सारखी करीत होती. ति बरोबर बोलत नव्हती आपले नाव, राहण्याचा पत्ता सांगत नव्हती.
तिच्या बातेवाईकांचा पोंभुर्णा शहरात व आजुबाजुला, गाव खेड्यांमध्ये शोध केला असता तिचा पत्ता मिळून आला नाही. तिचे शोधार्थ सोबत जोळलेल्या फोटो मधील वर्णनाच्या महीलेचा व तिच्या नातेवाईकांचा आप-आपले पो. स्टे. हदीत शोध करावे व मिळुन आल्यास पोलीस स्टेशन पोंभुर्णा जिल्हा चंद्रपूर व खालील क्रमांकावर संर्पक करावे.
तपासी अधीकारी:- 9421812595
पोलीस स्टेशन पोंभुर्णा
वर्णन:- रंग:- काळा, बांधा:- सळ-पातळ, उंची:- ४ फुट, वय:- अंदाजे ६५ वर्ष, भाषा:- हिंदी, डोक्यावरील केस:- बारीक, अशा वर्णणाची बाई.