महाविद्यालयांमध्ये दिनांक. 22/12/2020 रोजी रक्तदान शिबीर आयोजित.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे, म्हणून माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा कुलगुरू, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या आदेशाने विद्यापीठाच्या अंतर्गत विविध महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करायचे आहे.
त्याच अनुषंगाने स्थानिक चिंतामणी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, गोंडपिपरी येथील राष्ट्रीय सेवा योजना आणि प्राणीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक 22/12/2020 ला सकाळी 11 वाजता करण्यात येत आहे. या शिबिरास जास्तीत जास्त संख्येने इच्छुक रक्त दात्यानी सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालय तर्फे करण्यात येत आहे.
संपर्क:-डॉ. सी. ए. निखाडेप्राचार्य9823183607प्रा. प्रतिक बेझलवारराष्ट्रीय सेवा योजना, कार्यक्रम अधिकारी8668971169प्रा. डॉ. आशिष चव्हाणप्राणीशास्त्र विभाग प्रमुख9421729187