गोदरु पाटील जुमनाके यांचा आदर्श घेऊन समाजामध्ये काम करा.

Bhairav Diwase
माजी जिल्हा परिषद सदस्य सुधाबाई सिडाम यांचे प्रतिपादन.

कुसळ ग्रामस्थांकडून गोदरु पाटील जुमनाके यांना श्रद्धांजली अर्पण..

गोंडवाना गणतंत्र पार्टी कुसळ शाखेचे आयोजन.
Bhairav Diwase. Dec 2020
कोरपना:- गोदरु पाटील जुमानाके यांचं सामाजिक आणि राजकीय कार्य खूप मोठं आहे, त्यांचा आदर्श घेऊन समाजामध्ये काम करा, असे प्रतिपादन माजी जिल्हापरिषद सदस्य सुधाबाई सिडाम यांनी कुसळ येथील ग्रामस्थांकडून गोंडवाना गणतंत्र पार्टी चे लोकप्रिय नेते, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गोदरुजी पाटील जुमानके यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात त्या बोलत होत्या. 

      या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य सुधाबाई सिडाम, अरुण भाऊ मडावी, संजय सोयाम, लिंगाजी वेट्टी, मेजर बंडूजी कुमरे, सरपंच वसंता मडावी, चंद्रभान किन्नाके शिक्षक, सीताराम आत्राम शिक्षक, दशरथ किन्नाके, लक्ष्मन कुळसंगे व कुसळ येथील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाबाराव सिडाम, वैभव किन्नाके, पवन मडावी, विक्रम तोडासे, कपिल आत्राम, रितिक आत्राम यांनी प्रयत्न केले.