चंद्रपूर:- दिनांक 07/12/2020 ला आयकॉन बहुद्देशीय संस्था तुकुम ता.नागभीड़ जिल्हा चंद्रपुर तर्फे मुलांच्या अभ्यासाच्या अडचणी लक्षात घेता नगरपरिषद सी.ई.ओ मा. चौहान सर यांच्याकडे प्रभाग क्र.8 तुकुम येथे अभ्यासिका सुरु करावी या करिता आइकॉन बहुद्देश्यीय संस्था तुकुम च्या सर्व कार्यकारी युवकांनी गावत असलेली मुख्य मुलांना अड़चन मंजेच अभ्यासिका नाही व त्यामुळेच मुलाना नाहक त्रास सहन करवा लागत आहे.
आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे, व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण व्हावी या करिता गावात अभ्यासिका असणे गरजेचे आहे.या मागणी करिता पवन माटे(अध्यक्ष आयकॉन) मंगेश चौधरी, श्रीनंदन गजभे, वैभव श्रीरामे, स्नेहदीप दोहतरे, परम् चौके, स्वप्निल गायकवाड़, वृषभ डांगे, व गावातील काही नागरिक सुद्धा उपस्थित होते.