मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास.
आदिवासी बांधवांचा बुलंद आवाज हरपला:- आ. सुधीर मुनगंटीवार
महाराष्ट्र:- माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचं निधन झाले आहे. मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर असल्याने रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची अंतयात्रा उद्या (10 डिसेंबर) दुपारी 1 वाजता वाडा येथील निवासस्थानातून निघणार आहे.
भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी ते सतत जोडलेले होते. डोंबिवली नागरी सहकारी बँकेत नोकरी केली. सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. युती सरकारच्या काळात ते राज्यमंत्री होते. मागील सरकारमध्ये आदिवासी विकास मंत्री तथा पालघरचे पालकमंत्री होते.
आदिवासी बांधवांचा बुलंद आवाज हरपला:- आ. सुधीर मुनगंटीवार
माजी आदिवासी विकास मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते विष्णू सवरा यांच्या निधनाने आदिवासी बांधवांचा बुलंद आवाज हरपला अशी शोकभावना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
विष्णू सवरा यांनी कार्यक्षम व कार्यतत्पर लोकप्रतिनिधी म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. तळागाळातील सामान्य माणसाच्या उत्थानासाठी ते आयुष्यभर झटले . विधानसभेत आदिवासी बांधवांच्या हक्कासाठी बुलंद होणारा त्यांचा आवाज त्यांचा सहकारी म्हणून मी जवळून अनुभवला आहे. आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांनी आदिवासी बांधवांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. आदिवासी समाजात भाजपचे संघटन बळकट करण्यासाठी त्यांनी कायम परिश्रम घेतले. त्यांच्या निधनाने भारतीय जनता पार्टीची तसेच एकूणच राजकिय व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.