Click Here...👇👇👇

७ कोटी रूपयांचा ग्लोबल टिचर अवॉर्ड जिंकणारे डिसले गुरुजी कोरोना पॉझिटिव्ह.

Bhairav Diwase
1 minute read
Bhairav Diwase. Dec 10, 2020
सोलापूर:- सोलापूर - तब्बल ७ कोटी रूपयांचा ग्लोबल टिचर अवॉर्ड जिंकणारे बार्शीतील झेडपी शिक्षक रणजितसिंह डिसले गुरूजी हे बुधवारी सकाळी कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह निघाले. त्यांनी ही माहिती स्वत-हून व्हॉटसअपवर स्टेटसवर पोस्ट केली आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय ग्लोबल टिचर अवॉर्ड जाहीर झाल्यानंतर डिसले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता. गेल्या काही दिवसांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, प्रविन दरेकर वि. पक्षनेते यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी अभिनंदन करताना त्यांच्याशी चर्चा केली होती.

दरम्यान, "आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझ्या संपर्कात आलेल्या मंडळींनीही कोरोना टेस्ट करून घ्यावी. कोणतीही रिस्क घेऊ नये", अशी विनंती डिसले यांनी केली आहे. मुंबईहून गावी आल्यानंतर त्यांना लक्षणे दिसून येत असल्याने डिसले गुरूजींनी घरातल्या सर्वांची कोरोना तपासणी केली त्यात ते स्वत: व त्यांची पत्नी कोरोना पॉझिटिव्ह आले. बाकीच्या घरातील सर्व मंडळींचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला.