महाराष्ट्र स्टुडंट युनियन चंद्रपूर-गडचिरोली तर्फे विद्यार्थ्यांच्या विविध समस्याबाबत विद्यापीठाला निवेदन सादर.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन या अराजकीय विद्यार्थी संघटनेच्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा शाखांतर्फे विद्यापिठातील विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत गोंडवाना विद्यापिठाला नुकतेच निवेदन सादर करण्यात आले.
       कोविड -१९ या साथीच्या रोगाच्या गंभीर परिस्थितीमुळे उद्भवलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या आर्थिक अडचणींना विचारात घेऊन गेल्या चार महिन्यांपासून प्रथम,द्वितीय व तृतीय वर्षांचा निकाल गोंडवाना विद्यापिठाने परीक्षा न घेताच जाहीर केला. परंतु गेल्या त्यां दिवसापासून विद्यापिठाने घेतलेला परीक्षा शुल्क परतावा याबाबत विद्यापीठाने काहीही निर्णय अद्याप घेतलेला नाही. 
          यासंदर्भात विद्यापिठाला एक निवेदन सादर करुन विविध मागण्या करण्यात आल्या.त्यात प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षांचे परीक्षा शुल्क परत करण्यात यावे किंवा पुढील सत्रात समायोजित करण्यात यावे, २०२०-२१ या सत्रातील प्रवेश शुल्कामध्ये फक्त शिकवणी शुल्क आकारले जावे आणि ते सुलभ हप्त्यांमध्ये स्वीकारले जावे या मागण्यांचा समावेश आहे. 
           याबाबत डाॅ.अनिल चिताळे यांना निवेदन सादर करुन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली.यावेळी युनियनचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष चेतन वासाडे, गडचिरोली जिल्हाध्यक्ष बलवीरसिंग राठोड, निहाल मेहरकुरे, आशीष जाधव वृषभ कष्टे, रवी चौरे उपस्थित होते.