शिवबंधन तोडून गड्डमवार पकडणार कांग्रेस चा हात.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Dec 23, 2020
सावली:- 2019 मधे शिवसेने कडून ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातुन तब्बल 78 हजार मते घेवूनही कांग्रेसचे उमेदवार विजय वड्डेटीवार यांचा कडून पराभव स्वीकारनारे संदीप गड्डमवार हे शिवबंधन तोडून उद्या किव्हा परवाला मुंबई येथे कांग्रेस चा हात हातात घेणार असल्याची माहीती मिळाली असून त्या साठी संदीप गड्डमवार मुंबई ला रवाना झाले आहे.

  तब्बल तीन निवडणूकित ब्रम्हपुरी विधानसभा मधे पराभव स्वीकारणारे या क्षेत्रातील लोकप्रिय नेते म्हणून संदीप गड्डमवार यांनी या पुढे "विधानसभा" नाही असे म्हणत दोन पावुले मागे येत त्यांनी कांग्रेस मधे प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. संदीप गड्डमवार हे पूर्वश्रमीचे कांग्रेसचेच आहे. त्यांचे वडील माजी राज्यमंत्री स्व. वामनराव गड्डमवार हे चंद्रपुर व गड़चिरोली जिल्ह्यातील कांग्रेसचे मात्तब्बर नेते होते. 2005 मधे संदीप गड्डमवार हे जिल्हा परिषद मधे निवडणुक जिंकली त्यावेळी त्यांनी पूर्वी भाजपा व आत्ताचे कांग्रेसचे नेते दिनेश चिट्नुरवार यांचा पराभव केलेला होता. त्यानंतर 2009 ला ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातून कांग्रेस ने येनवेळी उमेदवारी नाकारल्या नंतर त्यांनी अपक्ष राहत निवडणूक लढली त्यात त्यांचा फक्त 5 हजार मतानी पराभव झालेला होता. पक्ष विरोधी भूमिका केल्या बद्दल कांग्रेस ने त्यांना 6 वर्षा साठी निकशासित केले होते. कार्यकर्त्यांचा आग्रह खातर त्यांनी राष्ट्रवादी कांग्रेस मधे प्रवेश करित 2014 ला निवडणुक लढली मात्र आमदार विजय वड्डेटीवार यांनी चिमूर सोडून ब्रम्हपुरी मध्ये धाव घेतली आणि गड्डमवार यांचा पराभव झाला. 
      
     2019 मधे राष्ट्रवादी कांग्रेस ला सोडचिट्ठी देत गड्डमवार मुंबई येथे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा हातानी शिवबंधन बांधले. निवडणुक लढली व त्यात ही पराभव झाला.त्यामुळे या पुढे विधानसभा नको असे म्हणत असतांनाच या कांग्रेसचे मात्तबर नेते ना. विजय वड्डेटीवार यांनी आपल्या काही खास नेत्यांना सूचना केली की "पंछी के पंख छाटो.. पंछी नही उड़ेगा" त्यांच प्रमाणे गड्डमवार यांचे अनेक समर्थक फोडण्यात कांग्रेस ला यश आले. समर्थक आत्ता कोणता झेडां घेईल हाती असे असतांनाच गड्डमवार कांग्रेस मधे जात असल्याचे भरपूर अफवा पसरविल्या. अखेर गड्डमवार यांनी समर्थकांची बैठक घेत तुम्ही जे म्हणाल तोच निर्णय घेवू असे म्हटले मात्र काही कट्टर समर्थक आधीच कांग्रेस मधे पक्ष प्रवेशाला सुरूवात केल्याने "बॉस के पहले दास" जात असल्याचे पाहून गड्डमवार यांनी कांग्रेस पक्ष प्रवेश घेत असल्याची माहिती आहे.
     
      ना. विजय वड्डेटीवार यांना टक्कर देणारा एकमेव नेताच म्हणून गड्डमवार कड़े पहिले जात होते मात्र गड्डमवार हे स्वतःच कांग्रेस मधे जात असल्याने आत्ता कांग्रेस मधे आनंदाचे वातावरण आहे. आता होत असलेल्या ग्रामपंचायत व पुढे होणाऱ्या जि. प, पं. स, व सावली नगरपंचायत च्या निवडणुकीची धुरा ही गड्डमवार यांचा खांद्यावर देणार असे भाऊ कडून आश्वासन मिळाले असल्याची माहिती येत आहे. गड्डमवार यांचा पक्ष प्रवेशामुळे सावली तालुक्यात कांग्रेस मजबूत होणार ह्यात शंका नाही मात्र गड्डमवार साठी वड्डेटीवार यांचाशी नाते तोडलेले अनेक जण, स्वताचे जीव प्रणाला लावणारे प्रामाणिक काम करणारे कार्यकर्त्यांमधे नाराजी आहेच. मात्र ती नाराजी गड्डमवार हे कशी दूर करणार की त्यांना वाऱ्यावर सोडणार हे पुढे दिसणार आहेच... सद्या कांग्रेस प्रवेशासाठी संदीप गड्डमवार हे विमानाने मुंबई ला गेले असून उद्या किव्हा परवाला प्रवेश निश्चित आहे. अशी माहिती गड्डमवार खास समर्थकानी दिली आहे.