घुग्घुस येथील मच्छी मार्केटचे अतिक्रमण हटवा.

Bhairav Diwase
भोई समाज बांधवांची मागणी.
Bhairav Diwase.   Dec 08, 2020
चंद्रपूर:- घुग्घुस येथील आठवडी बाजार परिसरात ग्रामपंचायतीने ओटे बांधुन दिले आहे. या ओट्यांवर मटन चिकन मच्छी विक्रेते ग्रामपंचायतीने नेमुन दिलेल्या जागेवर आपली दुकाने थाटतात. 

       काही दिवसापासून याठिकाणी चिकन मार्केट मधील दुकानदार नंदू शेंडे, नितीन कटारे, गणेश हिकरे यांनी त्यांना ग्रामपंचायतीने नमूद दिलेल्या जागेवर दुकाने न लावता मच्छी मार्केट मधील नमूद दिलेल्या जागेवर दुकाने लावत आहे.

           मच्छी मार्केट मधील मच्छी विक्रेत्यांनी आपली दुकाने कुठे लावावी असा प्रश्न पडत आहे. अतिक्रमण केलेल्या दुकानदारांना प्रश्न विचारला असता ते मच्छी विक्रेत्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करतात व मच्छी विक्रेत्यांची दुकाने फेकून देतात. नेहमीच वाद विवाद होत असते. भोई समाजाचा मच्छी विक्री हा परंपरागत व्यवसाय आहे.

        भोई समाजाचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर चालतो. या व्यतिरिक्त कोणताही व्यवसाय नाही आहे. चिकन विक्रेत्यांचे अतिक्रमण हटवुन जागा मोकळी करुन देण्यासाठी घुग्घुस ग्रामपंचायत प्रशासनाला भोई समाज बांधवांनी निवेदन देऊन मागणी केली आहे.

         निवेदन देतांना घुग्घुस भोई समाजाचे प्रकाश पचारे मंगेश पचारे रा.तु.दिघोरे राजू कामतवार सुनिल मांढरे अशोक कामतवार रविंद्र पचारे मारोती बौरवार अंकुश कामतवार किसन कामतवार किसन मांढरे संतोष कामतवार विजय कामतवार विनोद कामतवार दिलीप कामतवार गणेश कामतवार कैलाश कामतवार उपस्थित होते.

बातमी संकलन:- पंकज रामटेके