केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्या विरोधात पोंभुर्णा शहरात कडकडीत बंद.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- केंद्र सरकारने शेती व शेतकऱ्यांच्या संदर्भात पारीत केलेले कायद्याच्या विरोधात पोंभुर्णा शहरात सर्वपक्षीय कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंद ला पोंभुर्णा वासियांकडुन १००% प्रतिसाद मिळाला.
आजच्या बंदला भाजपा वगळता सर्व पक्षांनी पाठिंबा दिला होता. पोंभुर्णा शहर बंद करण्यासाठी पोंभुर्णा नगरविकास आघाडी, कांग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, आप, राष्ट्रवादी काँग्रेस, भाकप, माकप, पिपल्स रिपब्लिकन पक्ष, विदर्भ राज्य आंदोलन समिती, उलगुलान संघटना, शेतकरी संघटना, प्रहार संघटना इत्यादी पक्षांचे नेते आज सकाळपासून रस्त्यावर उतरले होते.
     आजचा बंद शांततापूर्ण करण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडी चे युवा नेते अविनाश कुमार वाळके यांनी केले होते. त्याला पोंभुर्णा शहरातील जनतेनेही सहकार्य केले.

     मोदी सरकारने शेतकरी विरोधात काळे कायदे पारित केल्याची भावना संपूर्ण देशभरातील शेतक-यांमधे दिसुन येत आहे. हा कायदा रद्द करावा म्हणून पंजाब हरियाणा व ऊत्तर प्रदेश येथील शेतकरी गारठणाऱ्या थंडीतही मोठ्या प्रमाणात दिल्ली च्या सीमेवर उपस्थित आहेत. मात्र त्यांना दिल्लीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर अश्रूधुर, पाण्याचा मारा केला जात आहे. त्यांना खलीस्थानी म्हणून संबोधले जात आहे. परंतु सरकार शेतक-यांच्या मागण्या मानायला तयार नाहीत. म्हणून शेतकरी नेत्यांनी 8 डिसेंबरला संपूर्ण भारत बंद ची हाक दिलेली आहे.त्याचाच एक भाग म्हणून पोंभुर्णा शहरात हि बंद करण्यात आले.विषेश म्हणजे आज शहरातील आठवडी बाजार होता तो बाजार हि बंद ठेवण्यात आला.यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी तहशीलदार मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना हा कायदा रद्द करण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आले.

      या बंदमध्ये पोंभुर्णा तालुक्यातील शेतकरी अशोक सातपुते, दिनकर वनकर, जिवन खोब्रागडे, अरुन नैताम, रामदास गव्हारे, तुळशीराम मोहुर्ले, हरीदास खोब्रागडे तसेच पोंभुर्णा नगरविकास आघाडी चे ओमेश्वर पद्मगीरीवार, अशोक गेडाम, पिंपल्स रिपब्लिकन पक्षाचे तेजराज मानकर, वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष श्यामकुमार गेडाम, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विनोद चांदेकर, शहर प्रमुख गणेश वासलवार, विजय वासेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विजय ढोंगे मनसेचे तालुकाध्यक्ष आकाश तिरुपतिवार, आशिष नैताम, अमोल ढोले, उलगुलान संघटनेचे रुपेश निमसरकार, विठ्ठल भडके, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे गिरिधर सिंग बैस, सामाजिक कार्यकर्ता दादुभाऊ ढोले, आदिवासी नेते मुर्लिधर टेकाम, अशोक सिडाम, अतुल वाकडे, सुनील कुंदोजवार, दिनेश नैताम,हिमगीरी सिंग बैस,अभि बद्दलवार,कालीदास येमुलवार, अतुल भडके,अफजल खान पठाण,रुषी गुरुणुले,मधुकर ढोंगे,राजु बोलमवार, महादेव सोमनकर, महेश श्रीगीरीवार, अरुण सातपुते,भुपाल आक्केमवार,छोटु कावटवार व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने