Top News

सापाने केलेली वटवाघळांची शिकार कॅमेऱ्यात कैद.

गोंडपिपरी तालुक्यातील धाबा गावातला प्रकार.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
चंद्रपूर:- सापाने वटवाघळांची केलेली शिकार कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या गोंडपिपरी तालुक्यातील धाबा गावात हा प्रकार घटना घडला. वर्दळीच्या भागात असलेल्या वडाच्या झाडावर हे दृष्य पाहायला मिळालं. अर्धा तासाच्या सावध चढाईनंतर सापाला शिकार करण्यात यश आलं आहे.

वडाच्या झाडावर असलेल्या वटवाघळांच्या पिलांची शिकार करण्यासाठी धामण सापाने थेट झाडावर चढाई केली. ही चढाई सावधपणे करताना त्याला अर्धा तास लागला. त्यानंतर मग घरट्यात असलेल्या वटवाघळांच्या पिलांची मोठ्या शिताफीने या सापाने शिकार केली. साधारणतः एक तास चाललेला हा शिकारीचा थरार गोंडपिपरी तालुक्यातील धाबा गावातील लोकांनी अनुभवला.

धामण जातीचा साप तसा तर बिनविषारी असतो. पडक्या घरात, गोदामात, लाकडांच्या राशीत हा साप हमखास आढळून येतो. धामण सापाचे आवडते खाद्य उंदीर आहे. मात्र, परिसरानुसार हा साप शिकारीत बदल करीत असतो. गोंडपिपरी तालुक्यातील धाबा गावातील शिवाजी चौकात भलेमोठे वडाचे झाड आहे. या झाडावर वटवाघळांनी डेरा टाकला. झाडातील एका पोकळीत वटवाघळांची पिल्ले होती. या पिलांवर धामण सापाची नजर गेली.

साधारणतः 20 ते 25 फूट उंचीवर असलेल्या वटवाघळांची शिकार करण्यासाठी सापाने झाडावर चढाई सुरु केली. अर्ध्या तासांनी तो वटवाघळांजवळ पोहचला आणि मोठ्या शिताफीने त्याने वटवाघळांची शिकार केली. वर्दळीच्या चौकातच हा थरार घडत असल्याने बघ्यांची एकच गर्दी उसळली. पण या गर्दीला जराही न घाबरता सापाने आपले सावज टिपले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने