(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) कु-रितेश एस. आसमवार, चामोर्शी
चामोर्शी:- दि. २३ नोहेंबर पासून राज्यातील ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा व महाविद्यालय सुरु करण्यात आलेले असून शालेय विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्याकरिता विद्यार्थ्याना खूप अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे चामोर्शी-येनपुर-जयरामपूर मार्गे बस सेवा त्वरित सुरु करण्यात यावी अशी मागणी शाळेतील विद्यार्थी व पालक करीत आहेत. लाकडाॅउनच्या काळात ग्रामीण भागतीत बससेवा बंद केल्या होत्या. त्या काळात नागरिकांना व विद्यार्थ्यांना बाहेर पडता येत नव्हते आता शासनाने शाळा व महाविद्यालय सुरु केले आहेत. त्यामुळे मुधोली तुकूम, मुधोली रिठ, मुधोली चक नं १, मुधोली चक नं ०२, लक्ष्मनपूर व दुर्गापूर येथील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांना ये-जा करण्याकरिता करिता खूप मोठी अडचण निर्माण झाली असल्याने या मार्गाची बस सेवा लवकरात लवकर सुरु करावी अशी मागणी शाळेतील विद्यार्थी व पालक करीत आहेत.