(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही पोलीस स्टेशनचे ठाणेदार मा. योगेश घारे साहेब (ए.पी.आय) यांनी दिनांक २१-१२-२०२०ला पुरोगामी पत्रकार संघाची बैठक आयोजित केली होती. पोलीस ठाण्यात सुरू असलेले गुन्हे सर्वाधिक कमी करण्यासाठी नियोजनबद्ध पध्दतीने ठाण्यातील पोलीस कर्मचारी सिंदेवाही शहराचे व तालुक्याचे संरक्षण करत आहे. तालुक्यात पेट्रोलियम ही कडक करण्यात आली आहे. पोलीस स्टेशन परिसरातील सौंदर्यीकरण,स्वच्छता ही पूर्वी पेक्षा व्यवस्थित केले जाते. बाजारात होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी महत्वाच्या उपाययोजना केल्या आहेत. व शहरात इतरही होत असलेल्या चोऱ्या तथा घडत असलेले गुन्हे यांवर कशाप्रकारे पायबंद घालता येईल यावर सुद्धा चर्चा करण्यात आली. तसेच शहरातील धार्मिक स्थान मंदिर, मस्जिद, विहार, चर्च व महापुरुषांचे पुतळ्याचे सरंक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी दैनंदिन पोलीस अधिकारी भेट देऊन सोबतच सेल्फी काढून ग्रुपवर त्याबाबत सुरक्षित असल्याचे संकेत देतात. शहरात रात्री पोलीस अधिकारी गस्त नियोजित पध्दतीने गस्त घालतात.
ते रात्री जागत असल्यामुळेच आज शहरातील जनता सुरक्षित झोप घेत आहे. आणि सिंदेवाही शहरात दररोज बसस्टॉप, बाजारात, तथा सार्वजनिक ठिकाणी पोलीस अधिकारी तैनात आहेत व जनतेच्या सरंक्षणासाठी तत्पर झालेली आहे. मी प्रत्यक्ष गस्तीवर असतांना मा. न्यायाधीश साहेब यांचे क्वाटर समोर रात्री सायरन वाजवून तेथील रजिस्टरला नियमितपणे नोंद केली जाते. महत्वाचे विशेष बाब म्हणजे सिंदेवाही पोलिस स्टेशनला जिल्ह्यातील ISO मान्यताप्राप्त बनविण्यासाठी मी प्रयत्नशील कार्यरत आहे. पुढे होऊ घातलेल्या ग्रा. पं. निवडणूक शांततेत व व्यवस्थित पार पाडण्यासाठी तुम्हा सर्व पत्रकारांचे विशेष सहकार्य अपेक्षित आहे.ज्ञअसे ते बैठकीत बोलत होते.त्याचप्रमाणे बैठकीला उपस्थित विशेष अतिथी पुरोगामी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष मा. रूपेश निमसरकार, तालुकाध्यक्ष भगवंत पोपटे, उपाध्यक्ष मिथुन मेश्राम, कार्याध्यक्ष आक्रोश खोब्रागडे, प्रसिद्धीप्रमुख कुणाल उंदिरवाडे हे प्रामुख्याने उपस्थित होते.