श्री. जयंत अरूण पिंपळशेंडे यांनी सलग तिनदा विजयी होत साधली हॅट्रीक.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Jan 22, 2021
पोंभुर्णा:- सात सदस्य असलेल्या चेक आष्टा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत श्री. जयंत अरूण पिंपळशेंडे यांनी सलग तीनदा विजयी होत हॅट्रीक साधली. 2020-2021 च्या ग्रामपंचायत निवडणुकीत ते वार्ड क्रमांक 02 मधून निवडणूक लढवली. वार्डातील लोकांच्या संमतीने त्यांच्या विरोधात कुणीही अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे जयंत पिंपळशेंडे या निवडणुकीत बिनविरोध विजयी झाले. 2010 ते 2015 या कालावधीत सदस्य होते. 2015 ते 2020 या कालावधीत सरपंच पद भुषविले होते. सध्या 2020 सदस्य म्हणून विजयी झाले आहेत.

श्री. जयंत पिंपळशेंडे यांनी 2010 पासून ग्रामपंचायतीच्या राजकारण आले. त्यांनी 2010 मध्ये कॉंग्रेसच्या पॅनेल मधून निवडणूक लढवली. आणि ते विजयी पण झाले. त्यापासून राजकारणात सक्रिय झाले. पाच वर्षाच्या कालावधीत ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केले.

2015 च्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जयंत पिंपळशेंडे यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांनी 2015 च्या ग्रामपंचायत निवडणुक भाजपा समर्पित पॅनल लढवली होती. त्या निवडणूकीत 03 उमेदवार आणि आपण स्वत: निवडणूकीला सामोर गेले. निवडणूकीत भाजपा पॅनल विजयी झाले. आणि चेक आष्टा ग्रामपंचायतीत भाजपाचा झेंडा फडकला. 2015 च्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायत सरपंच म्हणून काम केले. 2015-2020 या कालावधीत चेक आष्टा गावाचा विकास करण्यासाठी सक्रिय काम केले. आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार माजी अर्थ, नियोजन व वने मंत्री यांच्या नेतृत्वात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे व जिल्हा परिषद सदस्य राहुल भाऊ संतोषवार यांच्या मार्गदर्शनाखाली चेक आष्टा गावातील रस्त्याच कामे, नालीचे कामे, व्यायाम शाळेच बांधकाम व व्यायाम साहित्य, स्मशानभूमी बांधकाम, शुद्धीकरण यंत्रणा (आरो), जिल्हा परिषद शाळेच बांधकाम, जिल्हा परिषद शाळेसाठी क्रिडा साहित्य, हनुमान मंदिर सभागृह बांधकाम, व सौंदर्यीकरण, 45 घरकुल योजनेचा लाभ, हातपंप (बोअरवेल), 35 इलेक्ट्रीक वाढीव पोल, श्री. जयंत पिंपळशेंडे यांनी 05 वर्षाच्या कालावधीत सरपंच पद भुषवितांना असे अनेक प्रकारचे काम या काळात केले.

2020-2021 ग्रामपंचायत निवडणुकीत जयंत पिंपळशेंडे यांनी निवडणूक लढवली. यावेळी सुध्दा जयंत पिंपळशेंडे यांनी भाजपा समर्पित शेतकरी ग्रामीण विकास आघाडी पॅनलचे उमेदवार उभे केले. पण हि निवडणूक भाजपा विरुद्ध गोंडवाना गणतंत्र पार्टी असा सामना होता. 2020-2021 च्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा समर्पित उमेदवार सौ. लिलाबाई अविनाश बोडेकार हि वार्ड क्रमांक 01 मधून निवडणूक लढवली. वार्डातील लोकांच्या संमतीने त्यांच्या विरोधात कुणीही अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे निवडणुकीत लिलाबाई अविनाश बोडेकार हि बिनविरोध विजयी झाली. श्री. जयंत अरूण पिंपळशेंडे यांनी वार्ड क्रमांक 02 मधून निवडणूक लढवली. वार्डातील लोकांच्या संमतीने त्यांच्या विरोधात कुणीही अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे या निवडणुकीत बिनविरोध विजयी झाले.
 
     भाजपा समर्पित शेतकरी ग्रामीण विकास आघाडी पॅनलचे उमेदवार वार्ड क्रमांक 01 आणि 02 मध्ये निवडून लढवत होते. यावेळी ग्रामपंचायत वर भाजपा झेंडा फडकविण्यासाठी आणखी दोन उमेदवार विजयी करण्याची आवश्यकता होती. सात सदस्य असलेल्या चेक आष्टा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 04 सदस्य असल्यास सत्तेत बसता येणार होत. ग्रामपंचायत निवडणुकीत शेतकरी ग्रामीण विकास आघाडी पॅनलचे 05 उमेदवार उभे होते. पण या निवडणुकीत भाजपा समर्पित 01 उमेदवार विजयी झाला. आणि बिनविरोध 02 उमेदवार विजयी झाले. एकूण 03 उमेदवार विजयी झाले. तर गोंडवाना गणतंत्र पार्टी चे 04 उमेदवार विजयी झाले. त्यामुळे सध्यातरी ग्रामपंचायत वर गोंडवाना गणतंत्र पार्टीची सत्ता येणार आहे. अस चित्र स्पष्ट दिसत असल तरी, ग्रामपंचायत सरपंचाच आरक्षण न पडल्या नंतर येणाऱ्या काळात चेक आष्टा ग्रामपंचायत वर कुणाची सत्ता येणार? आणि कोण सरपंच पदाचे दावे करणार? याकडे चेक आष्टा येथील नागरिकांचे लक्ष लागले आहे. 


भारतीय जनता पार्टी विजयी उमेदवार....
01) जयंत अरूण पिंपळशेंडे
02) जिवनदास कुंभरे
03) सौ. लिलाबाई अविनाश बोडेकार

गोंडवाना गणतंत्र पार्टी विजयी उमेदवार....
01) जगन येलके
02) सरीता मरस्कोल्हे
03) मिनाक्षी येलके
04) कांताबाई मडावी