मोतीराम अर्जुनकर यांच्या शेतात वाघाचे दर्शन झाल्याने शेतातील मजुरात भीतीचे वातावरण.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- आज दिनांक २०/०१/२०२० ला सकाळी १०:०० वाजताच्या सुमारास भीमनगर परिसरात मोतीराम अर्जुनकर यांचे शेतात सकाळी काही महिला कापुस काढण्याचे काम करीत असताना एका महिलेला अचानक पट्टेदार वाघ समोर असल्याचे निदर्शनास आले. नुसते वाघ म्हटले तरी अंगावर शहारे उभे राहतात. आणि अचानक आपल्या समोर वाघोबा म्हटले की मग कल्पना केलेली बरी.
तशातच प्राथमिक माहिती नुसार शेतात काम करीत असणारी महिला कापुस काढीत पुढे जात असताना महिलेला समोर पट्टेदार वाघ दिसला. त्याला पाहताच त्या महिलेने हडुवारपने मोठ्या हिमतीने तिथुन गावाकडे मार्ग काढीत गाव गाठले व लोकांना माहिती दिली. त्यानंतर गावातील लोक शेताकडे जाई पर्यंत तिथून वाघ पसार झाल्याचे प्रत्यक्षदर्शी कडून कळाले. सध्य्या वाघ जरी आसपास दिसत नसला तरी शेतावर काम करणाऱ्या महिला मजूरामधे भीतीचे वातावरन निर्माण झालेले आहे.