सावली:- कु. स्वाती वामन शेंडे हि मुलगी सावली येथील रहिवासी असुन विश्वशांती विद्यालय सावली येथे इयत्ता दहावी वर्गात शिकत होती. दहावी वर्गातील टॉपर, एक प्रामाणिक व हुशार विद्यार्थीनी आणि सर्वांन सोबत मिळून राहणारी मुलगी होती. महात्मा फुले वाचनालय सावली येथील एक हुशार विद्यार्थीनी होती.
आज दिनांक २०/०१/२०२१ सायंकाळी ४ वाजता गडचिरोली येथे अल्पशा आजाराने कु. स्वाती वामन शेंडे हिच निधन झाले. आज शेंडे परीवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
तिच्या आत्म्यास शांती लाभो व तिच्या घरच्यांना दुःखातून लवकर सावरावे अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. भावपूर्ण श्रद्धांजली.
शोकाकुल:- ज्ञान ज्योती फाउंडेशन तथा माळी समाज सावली.