पोंभुर्णा:- आदर्श ग्राम घाटकुल ग्रामपंचायत निवडणुकडे सर्व राज्यातील नेते मंडळी चे लक्ष असताना भाजपा पंचायत समिती सदस्य विनोद देशमुख यांच्या नेतृत्वाखाली घाटकुळ येथील शेतकरी ग्रामीण विकास आघाडीचे उमेदवार बहुमताने निवडून आले.
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२१ घाटकुळ ग्रामपंचायत निवडणुकीत रजनी हासे, जयपाल दुधे, सुप्रीम गद्धेकार, विठ्ठल धंदरे, रंजना राळेगावकर, शितल पाल विजयी झाले आहे. 9 पैकी 6 उमेदवार विजयी होऊन ग्राम पंचायत घाटकुळ ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा बसल्याने घाटकुळ गावातील मतदार बंधू भगणींचे तसेच कार्यकर्त्यांचे विनोद देशमुख व विजयी उमेदवारांने जाहीर आभार मानले.
विजयी उमेदवारांचे माजी अर्थ तथा वन नियोजन मंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री मा. हंसराजजी अहीर, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी विजयी झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन केले.
यावेळी भाजपा महिला जिल्हाध्यक्ष पंचायत समिती सभापती अल्का आत्राम, भाजपा तालुकाध्यक्ष गजानन गोरंटीवार, पंचायत समिती सदस्य विनोद देशमुख, भाजयुमो तालुकाध्यक्ष अजय मस्के भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी अर्थ तथा वन वित्त नियोजन मंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार तसेच माजी जिल्हा अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी गावासाठी विकासाचे केलेले काम आणि गावकऱ्यांनी दाखविलेले विश्वास यांचे हे फळ आहे.
श्री. विनोद देशमुख
पंचायत समिती सदस्य, पोंभूर्णा