पोंभुर्णा:- दि. 12 जानेवारीला स्थानीय चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभुर्णा, राष्ट्रीय सेवा योजना तर्फे स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ यांचा जयंती साजरी करण्यात आली. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. या सोहळ्याला महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कॉलेजचे प्राचार्य डॉ .टी एफ गुल्हाने यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. स्वामी विवेकानंद जी चे विचार आत्मसात करा. स्वामी विवेकानंद विचारांची आज आवश्यकता आहे. ज्ञानाची आवश्यकता आहे. तसेच डॉ. संघपाल नारनवरे राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी त्यांनीसुद्धा उपदेश दिले. या कार्यक्रमात उपस्थित डॉ. पौर्णिमा मेश्राम, प्रा. ओमप्रकाश सोनोने, प्रा. नितीन उपर्वट, प्रा. बुधे पराग बोमकंटिवार, विशाल कटकमवार, तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.