नारंड्यात क्रांतिज्योती सावित्रीबाईची जयंती उत्साहात साजरी.कोरप

Bhairav Diwase
डालमिया भारत फाऊंडेशन व आदर्श किसान विद्यालय यांचा स्तुत्य उपक्रम.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- समाजातील स्त्रियांच्या प्रगतीचा आलेख चढता दिसणे सकारात्मक बाब आहे. आज स्त्रिया अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असून याचे श्रेय स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना जाते असे प्रतिपादन डालमिया भारत सिमेंट कंपनीच्या सी.एस.आर. उपक्रमातील कम्युनिटी मोबिलायझर पदावर कार्यरत लक्ष्मण कुळमेथे यांनी केले. पुढे ते म्हणाले की, सावित्रीबाईंचे परिश्रम जीवनाला नवी प्रेरणा देऊन जाते. या भागातील मुलींनी क्रांतीज्योती सावित्रीाईचा आदर्श घेत यशाची शिखरे गाठावी. नारंडा येथील आदर्श किसान विद्यालय येथे सावित्रीाईची १९० वी जयंती साजरी करण्यात आली . यावेळी अध्यक्षस्थानी बोलताना शिक्षक श्री. अनिल मोडकवार यांनी सावित्रीबाईंच्या जीवनातील अनेक अनुभव सांगितले.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री. खामणकर सर, सौ. साळवे मॅडम, श्री. गोरे सर, श्री. फुलझले सर, श्री. माडुरवार सर, श्री दवंडे सर उपस्थित होते. संचालन जया तिखट यांनी केले. यावेळी स्नेहा मडावी , पायल आगलावे, श्रेयस परुसटकर आदी विद्यार्थ्यांनी मनोगत मांडले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्वेता बोढे यांनी केले. दरम्यान डालमिया भारत कंपनी सामाजिक दायित्वातून या भागातील विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी अनेक समाजपयोगी कार्य करीत राहील अशी ग्वाही लक्ष्मण कुळमेथे यांनी यावेळी दिली. डालमिया भारत फाऊंडेशनचे प्रशांत भिमनवार सर, आदर्श किसान विद्यालय नारंड्याचे मुख्याध्यापक नंदकिशोर माहुरकर सर यांचे मार्गदर्शनात हा कार्यक्रम पार पडला.