भाजपा कार्यालयात गरजू विद्यार्थ्यीना शिक्षणासाठी मदत करुन महिला शिक्षण दिन साजरा.
पोंभुर्णा:- भाजपा कार्यालय पोभुर्णा येथे भाजपा महिला आघाडीच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. मुलीच्या शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजीच्या "बेटी बचाव, बेटी पढाओ" या उपक्रमाखाली तालुक्यातील आर्थिक परिस्थिती नसल्याने फी भरू न शकणाऱ्या तसेच पुस्तक नसल्याने शिक्षण पूर्ण न करु शकणाऱ्या मुलीना पुस्तके आणि फी साठी भाजपा महिला आघाडी तर्फे मदत केली जाणार आहे. याची आज पासून सुरुवात करण्यात आली. अनुश्री बल्लावार, आणि मंगला कोसरे ही दिव्यांग असुन काम करुन आपले शिक्षण करते पायल गुरनुले यांच्या पासुन सुरवात करण्यात आली.
यावेळी कु. अल्का आत्राम जिल्हाध्यक्ष भाजपा महिला आघाडी चंद्रपुर, सचिव श्वेता वनकर, उषाकिरण वनकर, शारदा कोडापे, शेखताई मारोती मोहुले, मैदमवार ताई धोडरे ताई रणदिवे ताई, अजित मंगळगिरीवार, अजय मस्के, ऋषी कोटरंगे, गजानन मुडपुवार, विनोद कानमपल्लीवार, चरण गुरूनुले, राजु ठाकरे, यांची उपस्थिती होती.
ठरवून दिलेल्या रक्कमेची पुस्तके व फी ची मदत केली जाणार असून, यासाठी भाजपा कार्यालय येथे संपर्क करावे असे आवाहन करण्यात आले.