महात्मा फुले वाचनालयात राष्ट्रीय युवा दिवस व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Jan 13, 2021

सावली:- महात्मा फुले वाचनालयात स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली.
  
     स्वामी विवेकानंद यांचा जन्म दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. महान स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला होता. त्यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्ता होते, परंतु बालपणातच त्यांना प्रेमाने नरेंद्र म्हणून म्हटले जात असे. स्वामी विवेकानंद एक महान व्यक्ती होते. ज्यांचे उच्च विचार, आध्यात्मिक ज्ञान, सांस्कृतिक अनुभवाचा प्रत्येक व्यक्तीवर प्रभाव पडतो. ज्याने प्रत्येकावर एक अनोखी छाप पाडली आहे. त्यांचे जीवन प्रत्येकाच्या जीवनात नवी उर्जा भरते आणि पुढे जाण्यासाठी प्रेरणा देते. ते वेदांचे पूर्ण ज्ञान असणारे एक अलौकिक प्रतिभावान व्यक्ती होते. विवेकानंद हे दूरदर्शी विचारसरणीचे मनुष्य होते. त्यांनी केवळ भारताच्या विकासासाठीच कार्य केले नाही तर लोकांना जगण्याची कलादेखील शिकविली.
                               

         स्वामी विवेकानंद एक दयाळू व्यक्ती होते जे केवळ मानवावरच नव्हे तर प्राणीमात्रावरसुद्धा प्रेम करायचे. त्यांनी नेहमीच बंधुता, प्रेम शिकवले आणि त्यांचा असा विश्वास होता की प्रेम, बंधुता आणि सौहार्दाने जीवन सहजतेने पूर्ण केले जाऊ शकते आणि जीवनातील प्रत्येक संघर्षाला सहजपणे आपण सामोरे जाऊ शकतो. ते खूप स्वाभिमानी व्यक्ती होते.

                
        तसेच जिच्‍या हाती पाळण्‍याची दोरी ती जगाला उध्‍दारी उद्धृत केलेल्या ओळी म्हणजे मातृत्वाच्या महन्मंगल अविष्काराच्या परमोच्च क्षणाचा सुंदर रेखीव नमुनाच! युगपुरुष शिवराय घडले, वाढले आणि.

'निश्चयाचा महामेरू! बहुता जनांसी आधारू!
श्रीमत योगी!
                                                                           असे ज्यांचे वर्णन केले जाते, ती सारी कुणाची पुण्याई ध्येयवेड्या आईची, निराग्रही मातेची आणि वीरमाता, माँसाहेब जिजाऊंची! 
                                                                                               राजमाता जिजाऊसाहेबांनी शिवनेरीच्या अंगाखांदयावर लहानाचा मोठा करताना, सह्याद्रीच्या कुशीत निर्भयपणे वावरायला, शिकविताना शिवरायांना महाभारत आणि रामायणातील 'राम आणि कृष्णांच्या' गोष्टींचे बोधामृत पाजताना स्वराज्यस्थापनेचे बाळकडू पाजले. 'हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे' त्या मूलमंत्राचा उतरविला, ती मातृत्वशक्ती म्हणजे राजमाता जिजाऊ.
                                                                         १२ जानेवारी १५९५ मध्ये विदर्भातील सिंदखेडराजा येथे गिरिजाबाई व लखुजी जाधवांच्या पोटी जे अद्वतीय कन्यारत्न जन्माला आले ते म्हणजे जिजाऊ.... यांची जयंती साजरी करण्यात आली. तसेच रक्तदान शिबिराधे ज्यांनी रक्तदान दिले त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
                                                                           या कार्यक्रमाचे संचालन विक्रांत ठाकरे, प्रास्ताविक प्रवीण चौधरी, आभार प्रमोद चौधरी यांनी मानले. यावेळी संपूर्ण माळी समाज बांधव व फुले स्वयंसेवक उपस्थित होते.