महिला समूह आणि महिला अध्ययन केंद्रातर्फे सोनापुर येथे "सॅनिटरी पॅडचे" मोफत वितरण.

Bhairav Diwase
चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स, पोंभुर्णाचा उपक्रम.
 Bhairav Diwase. Jan 20, 2021
पोंभुर्णा:- स्थानिक चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स, पोंभुर्णा मधील कार्यरत महिला समूह आणि महिला अध्ययन केंद्रातर्फ सोनापूर (राष्ट्रीय सेवा योजना दत्तक गाव) ता. पोंभुर्णा येथे महिलांसाठी "सॅनिटरी पॅडसचे" मोफत वितरण करण्यात आले. आतील भागातील गावामधील मुलीच्या आणि महिलांच्या अडचणी लक्षात घेता महिला समूह आणि महिला अध्ययन केंद्र अधिकारी डॉ. मेघा कुळकर्णी, सदस्या सौ. वर्षी शेवटे, सौ. वैशाली मुरकुटे, सौ. ईश्वरी उराडे यांनी कार्यक्रम नियोजन केले.

    कार्यक्रमाप्रसंगी सौ. कल्पनाता गौरकार माजी उपसरपंच आणि सौ.चंद्रभागाताई पिंपळशेडे अंगणवाडी सेविका , सोनापूर वैयक्तिकरित्या हजर होत्या. तसेच गावातील इतर महिला व मुली उपस्थित होते. डॉ. मेघा कुळकर्णी अध्यक्षा यांनी सॅनिटरी पॅडसचे महत्व समजावून सांगितले आणि उद्देश समजावून सांगितले. त्यावेळी सगळ्यांच्या हस्ते सॅनिटरी पॅडचे ०३ बॉक्स अंगणवाडी सेविका यांच्याजवळ देण्यात आले.
    
    सदर कार्यक्रम प्राचार्य डॉ. सुधीर हुंगे, उपप्राचार्य प्रा सतिश पिसे आणि प्राध्यापक, प्राध्यापिका तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या प्रोत्साहनामुळे कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला यशस्वी आयोजन करण्यासाठी प्रा. सौ. वर्षा शेवटे, प्रा. सौ. सरोज यादव, सौ ईश्वरी उराडे, राहुल सुर्यतळे, ज्ञानेश्वर मरस्कोल्हे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.