🙏🙏


🟥
🟥✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

राष्ट्रीय किसान मंच तथा नगर मार्केट मधील व्यापारी बांधवांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- दिनांक 30 जानेवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुण्यतिथी दिवस परंतु आजच्या दिवशी भद्रावती शहरातील गांधी चौक येथे त्यांच्या पुतळ्याला साधा हार घालून त्यांना अभिवादन करावे ज्यांचे नाव वेळोवेळी घेऊन आजपर्यंत सगळ्या राजकारण्यांकडून निवडणुका लढल्या व जिंकल्या गेल्या परंतु त्यांच्या पुण्यतिथी च्या दिवशी कोणत्याही राजकीय नेत्याला किंवा समाजसेवकाला त्यांची आठवण येऊ नये किंवा त्यांचे विस्मरण व्हावे व ते झाल्यानंतर असे वाटते की आज राष्ट्रपिता महात्मा गांधी राजकीय अनास्थेचे बळी ठरले. आज दि 30-1-2021ला सायंकाळी 5 वाजता हि गोष्ट राष्ट्रीय किसान मंच च्या पदाधिकारी व स्थानिक नगर मार्केट मधील व्यापारी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सगळ्यांनी मिळून गांधीजींच्या पुतळ्याची साफसफाई करून व हार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. 
 याप्रसंगी अकिल शेख,गणेश महाजन,निलेश बिंजवे,निलेश रोकडे,जमील शेख,हरीश बोरा ,श्री पेंद्रे, प्रदीप कावळे,पिंटू मडावी,नितीन मशिदकर,प्रकाश पामपट्टीवर,राष्ट्रीय किसान मंचचे सर्व पदाधिकारी व नगर मार्केट मधील सर्व व्यापारी बांधव उपस्थित होते.