Click Here...👇👇👇

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत धनराज दुर्योधन प्रथम.

Bhairav Diwase
1 minute read


(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- अखील भारतातील स्त्रीयांच्या मूक्तिदात्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मोत्सव सप्ताहानिमित्त दिनांक ७जानेवारी ते २०जानेवारी २०२१दरम्यान सातारा येथे रिफ्लेक्टीव्ह रिडर्स ग्रृप च्या वतीने आयोजित केलेल्या आॅनलाइन राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत धनराज रघुनाथ दुर्योधन (ता.राजुरा , जि.चंद्रपूर) यांने प्रथम क्रमांक पटकावला.प्रतिक संजय अलई (ता.चाळीसगांव, जि.जळगांव) यांनी द्वितिय क्रमांक तर अंकिता संतोष लोकरे (ता.जि.सोलापूर)हिने तृतिय क्रमांक मिळवला.या राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत उत्तेजनार्थ हर्षराज प्रविण बनसोडे (ता.खंडाळा,जि.सातारा) व हर्षवर्धन अभयसिंह माने (ता.खंडाळा,जि.सातारा)यांना मिळाला.या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातून अनेक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवून दिलेल्या विषयावर स्पर्धकांनी निबंध लिहिले.या स्पर्धेचे परिक्षक म्हणुन प्राध्यापक अमोल कांबळे व अॅड.दयानंद माने यांनी काम पाहिले.सहभागी सर्व स्पर्धकांना सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.रिफ्लेक्टीव्ह रिडर्स ग्रृपच्या टिमनी सर्व विजेत्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.