चंद्रपुर:- काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील मंत्र्यांना व नेत्यांना मिळणाऱ्या सुरक्षेविषयी आढावा घेण्यात आला होता. त्यानंतरच हा निर्णय घेतला असल्याचं सूत्रांकडून समजतंय. यावेळी भाजप नेत्यांसह इतर पक्षांच्या नेत्यांच्याही सुरक्षेत कपात करण्यात आली आहे.
माजी अर्थमंत्री लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांची सुद्धा सुरक्षा काढण्यात आली असून त्यांनी समाजमाध्यमांद्वारे सरकारचे धन्यवाद मानत आपण माझी सुरक्षा काढली, नक्षलग्रस्त जिल्ह्यात असल्यामुळे ही सुरक्षा देण्यात आली होती. पण आता नक्षलवाद संपलेला दिसतोय. आमची सुरक्षा काढली असली तरीही जनतेच्या हिताच्या सुरक्षेसाठी आमचा आवाज आणखी धारदार होईल. असा टोला आमदार मुनगंटीवार यांनी सरकारवर लगावला आहे.