विरोधकांची अनामत रक्कम जप्त होण्याच्या मार्गावर?
पोंभुर्णा:- पोंभूर्णा तालुक्यातील वेळवा (माल) ग्रामपंचायत निवडूकीवर सर्व पक्षिय बड्या नेत्यांच्या नजरा लागून असतानाच मागील काही वर्षापासुन गावात समाजसेवेचे काम करत असलेल्या "शिवमहोत्सव समिती" ने आपल्या कार्याच्या भरवश्यावर गावातील बहुतांश लोकांची मने जिंकत आपले वर्चस्व गाठताना दिसून येत आहे . शिवमहोत्सव समीती चे उमेदवार निवडणूक लढवताहेत आणी ते ६ उमेदवार उच्चशिक्षित असलेल्याने आणि येणाऱ्या काळात गावाचे नेतृत्व युवकांच्या हातात जात आहेे. असं दिसताना गावातील नागरीकांमध्ये अती आनंदाचे वातावरण पसरले आहे.
हे सर्व असतानाच, विरोधातील उमेदवार आपल्या प्रभागातील मते जिंकण्यासाठी "शिवमहोत्सव समिती" ला बदनाम करण्याचे षडयंत्र रचतांना दिसुन येत आहे. पण शिवमहोत्सव समिती कलंक लागेल असं काही करणार नाही असं मत काही सुज्ञ नागरीकांचा आहे, तसेच विरोधकांच्या वाट्याला किती मते पडणार? आणि विरोधक खरंच आपली अनामत रक्कम वाचवू शकणार काय? याकडे साऱ्याकडे गावाचे लक्ष लागल्याचे चित्र दिसून येत आहे.