पोंभुर्णा तालुक्यातील भटारी येथील घटना.
पोंभुर्णा:- चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात काही दिवसांपासून वाघाचे हल्यात मोठ्या संख्येने वाढ झाली आहे.
काही दिवसांपूर्वी पोंभुर्णा तालुक्यातील केमारा येथे वाघाच्या हल्ल्यात एक युवक व दोन बकऱ्यांचा मृत्यू झाला होता. ति घटना ताजी असताना, काल दिनांक ०४/०१/२०२१ ला महादेव पेंद्राम रा. भटारी यांच्या मालकीचे बैल जंगलात चरायला गेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने एका बैलावर हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना काल ५:०० वाजताच्या सुमारास घडली.
वृत्त लिहेपर्यंत घटनास्थळी फॉरेस्ट चे अधिकारी व कर्मचारी उपस्थित झालेले नव्हते.