सहा जागेवर विजय ; भास्कर मते यांचे नेतृत्व.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- तालुक्यातील वनोजा ग्रामपंचायत निवडणुकीत शेतकरी संघटनेने सहा जागेवर विजय संपादन केला.
यामध्ये प्रभाग एकमध्ये हर्षकला चंद्रकांत मत्ते, छाया जगदीश पेटकर, दिलीप रामचंद्र पाचभाई , प्रभाग दोन विमल विलास वेट्टी तर प्रभाग तीन संदीप मारोती पंधरे, गुणवंत नानाजी वेटी यांनी विजयश्री खेचून आणली.मागील निवडणुकीत या ठिकाणी भाजप ने सत्ता प्रस्थापित केली होती. मात्र अवघ्या पाच वर्षात भाजपाला येथील सत्ता सोडावी लागली. ही निवडणूक माजी सरपंच तथा बाजार समितीचे संचालक भास्करराव मते यांचे नेतृत्वात लढण्यात आली. यानिमित्त वनोजा गावात जल्लोष साजरा करण्यात आला.