सम्यक विधार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष मा.धीरज तेलंग यांनी केले नेतृत्व.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
चंद्रपुर:- दिनांक 04 जानेवारी 2021 रोजी मा. जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांना सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवेदन.
सन 2020 ते 21 या सत्रामधील मधील मागासवर्गीय मुला मुलींच्या शासकीय वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया तात्काळ सुरू करुन वसतिगृह सुरू करावे अशा मागणीचे निवेदन सम्यक विद्यार्थी आंदोलन चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मा.धिरज तेलंग यांच्या नेतृत्वात दिले.
राज्यामध्ये कोरोना महामारीचा प्रकोप सुरू आहे व जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयात नेहमीप्रमाणे बऱ्याच महाविद्यालयांमध्ये आफलाईन आणि आनलाईन वर्गसुद्धा मागील दोन ते तीन महिन्यापासून नियमित सुरू आहे तसेच विद्यापीठ परीक्षा फॉर्म , प्रयोग शाळा वर्ग सुद्धा सुरू झाल्या आहे . वसतिगृहातील प्रवेशीत मागासवर्गीय विद्यार्थी दुर्गम भागातील असल्याने ऑनलाइन आणि आफलाईन शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. कारण आनलाईन वर्गासाठी विध्याथ्याकडे smart phone नाही बऱ्याच खेडे गावात internet सुविधा उपलब्ध नाही शिकायची खूप इच्छा आहे पन आता पर्यंत वसतिगृह सुरू झाले नाही.
गरजु, गरीब ,मागास विद्यार्थ्यांना शिक्षणापासुन वंचित राहावे लागत आहे. तरीसुद्धा समाज कल्याण विभागामार्फत शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेला अजून पर्यंत सुरुवात झालेली नाही आहे ही खेदाची बाब आहे. कोणताही विधार्थी शिक्षणापासुन वंचित राहू नये या करिता माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना विनंती केली की गांभीर्याने यावर विचार करावा व वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरु करुन वसतिगृह तात्काळ सुरू करावे या बाबतचे निवेदन देण्यात आले त्यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलन चंद्रपूर चे सदस्य नारायण येंगडे, सचिन गोरे तसेच वसतिगृहाचे इतर विद्यार्थी सुद्धा उपस्थिती होती.